चंदगड सहकारी पतसंस्था संघटनेचा रविवारी स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2022

चंदगड सहकारी पतसंस्था संघटनेचा रविवारी स्नेहमेळावा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुका सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटना सेवकांचा  स्नेहमेळावा रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता देव रवळनाथ मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रवळनाथ पतसंस्थेचे संस्था प्रणेते सदानंद आवटे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे भुदरगड - राधानगरीचे प्रकाशराव आबीटकर उपस्थित रहाणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून मानसतज्ञ, आस्था कौऊन्सेलिंग सेंटर, पुणेचे डॉ. मयुरेश डंके, व्यवस्थापन सल्लागारसह संयोजक कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे रविंद्र देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, काँग्रेस राज्यकार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर उपस्थित रहाणार आहेत . यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन चंदगड तालुका सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले आहे..

No comments:

Post a Comment