डाॅ. बी. डी. आजळकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डाॅ. बी. डी. आजळकर यांची नियुक्ती करण्यात आली. गुरूवारी डॉ. आजळकर यांनी प्रभारी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्रशांत शेंडे, प्रा. डाॅ. आय. आर. जरळी, प्रा. ए. एस. बागवान, प्रा. ए. एस. जाधव यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
No comments:
Post a Comment