बापूसाहेब शिरगांवकर यांना "भारत कर्तव्यम समाजभूषण पुरस्कार" - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2022

बापूसाहेब शिरगांवकर यांना "भारत कर्तव्यम समाजभूषण पुरस्कार"

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई, विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्याकडुन कला, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ऊत्तुंग कार्य करणार्‍या व्यक्ती व संघटनांचा सत्कार केला जातो. "सन्मान प्रगतीचा, गौरव कर्तुत्वाचा" या राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन बेळगाव. २०२२ यामधे अखिल भारतीय मानवाधिकार संघटना कोल्हापुर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिरगांवकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, सुप्रसिध्द थोर समाज सेवक पद्मश्री पुरस्कार भारत सरकार डाॅ. रविंद्र कोल्हे व डाॅ. स्मिता कोल्हे यांच्या शुभहस्ते लोकमान्य रंगमंदिर, बेळगांव येथे मंगळवारी १६ रोजी या विशेष पुरस्काराणे सम्मानित करण्यात आले.

          अध्यक्ष स्थानी लेखक / निर्माते संदिप राक्षे होते. उद्घाटक माजी मुख्य पंच भारत पाकिस्तान शुटींग बाॅल अशोक दाभोळकर तसेच संम्मोहन उपचारतज्ञ दिपक बोडरे, नृत्य अभिनेत्री सिने तारखा रिया पाटील, प्रसिध्द  जादुृगर प्रेम आनंद, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. थाबाजी शिंदे, शामरंजनच्या अध्यक्षा स्वाती पवार, विद्यार्थी विकास अकादमीचे अध्यक्ष प्रा. डाॅ. बी. एन. खरात, कृष्णा बामणे या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment