उमगांव शाळेत शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2022

उमगांव शाळेत शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह वाटप

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        उमगाव (ता. चंदगड) येथील केंद्र शाळेत आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना नितीन चव्हाण यांचेकडून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना मोफत ओळखपत्र, वह्या, पेन, पेन्सिल, आदी शैक्षणिक इत्यादी साहित्य तर सरपंच  रुक्माना पांडुरंग गावडे व रेल्वे पोलीस उप.निरिक्षक लक्ष्मण विठोबा गावडे यांनी स्वयंभू मित्र मंडळ उमगाव (मुंबई) या नावाने शाळेसाठी अमृत महोत्सव निमित्त सन्मानचिन्ह दिली. या सन्मानचिन्हाचे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment