हलकर्णी ग्रामपंचायतीमध्ये, विधवा माता भगिनींचा मेळावा संपन्न |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा माता भगिनींसाठी मेळावा आयोजित करून हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटूरे यांनी विधवा माता, भगिनींचे सौभाग्य अलंकार अबाधित ठेवणे बाबत, तसेच निराधार पेन्शन योजना व यांनी या स्तुत्य उपक्रमामूळे विधवा माता भगिनींना समाजातील मान अधिकचं मिळेल, अशी अशा व्यक्त करुन ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गटप्रवर्तक भिकाताई कांबळे, आरोग्य सेविका शुभांगी पाटील, आशा सेविका पुष्पा नाईक, यांनी अंगणवाडी सेविका अश्विनी पाटील, सौ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विधवा माता भगिनींना ग्रामपंचायतीकडुन भेटवस्तू देण्यात आली.कार्यक्रमाला सदस्य प्रकाश सावंत, सुभेदार, धोंडीबा नाईक, कमल केसरकर, शोभा पाटील, शीतल जाधव, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विधवा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपसरपंच रमेश सुतार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment