चंदगड शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांचे "बांधकामाला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2022

चंदगड शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांचे "बांधकामाला निवेदन

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              चंदगड फाटा-ते च चंदगड शहरातून गेलेल्या गुरूवार पेठेतील रस्ता-ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्यावरुन अक्षरशः खड्यांचे साम्राज्य पसरले असुन वाहनधारकाबरोबरच गुरूवार पेठेतील व्यापारी वर्गाला दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता यांना दिले आहे.

          चंदगड फाट्यापासून ते गुरूवार पेठ-चंदगड स्मशान भुमी पर्यंत रस्त्यावर इतके मोठ खड्डे पडले आहेत की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या आहे हेच वहान धारकांना व पादचाऱ्यांना कळेनासे झाले आहे.माडखोलकर महाविद्यालयापासून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच गुरूवार पेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानावर खड्ड्यातील घाण वहानधारकाकडून उडवली जात आहे. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. तर दररोज एक-दोन अपघात घडत आहे. चंदगड शहरातील रस्ते खड्डे पडल्यामुळे व सदर रस्त्यातील खड्डुंयामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने सदर रस्त्यावरुन गाडी नेणे अथवा वाहतूकीसाठी तसेच रस्त्यावरुन ये- जा करणेसाठी आज रोजी अवघड झाले आहे. सदर खडयांमुळे वाहनांचे अपघात होऊन जीविताची व मालमत्तेची हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपणास वि रस्त्यातील खडयांमुळे अपघात होवून जीविताची अथवा मालमत्तेची हानी झालेस त्याला सार्वजनिक बांधकाम जबाबदार असेल. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वीच या रस्त्यावरील खड्डे बुजवावावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनीफ सय्यद, कलीम मदार, दिगंबर कोले, सागर गावडे, बाबू फगरे, किरण येरूडकर, सतिश तेजम, श्रीपाद सामंत, अजय गोवेकर, शाबुद्दीन नाईक, विकी येरूडकर, विशाल परब, विलास इलगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment