स्वामी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यात रंगणार दहिहंडीचा थरार, ५१ लाखांचे भव्य बक्षिस, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2022

स्वामी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यात रंगणार दहिहंडीचा थरार, ५१ लाखांचे भव्य बक्षिस, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील यांचा पुढाकार

शिवाजीराव पाटील

ठाणे / चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              कोरोनाच्या दोन वर्षांचा कठीण काम सरल्यानंतर यंदा निर्बंध शिथिल केल्याने दहीहंडीची 'पंढरी' असे म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीला लाखोंच्या हंडीचे वेध लागले आहेत. मराठी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात स्वामी प्रतिष्ठान'च्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपप्रणित आयोजित हा ठाण्यातील सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव असून यावर्षी या दहीहंडी उत्सवात एकूण ५१ लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. 

पत्रकार परिषदेत बोलताना स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील.
                          

       त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने' स्वामी प्रतिष्ठान'च्या माध्यमातून राज्यभरातील ग्रामीणक्षेत्रातील ७५ हजार गरजू महिलांची तपासणी मोफत कर्करोग करण्यात येणार आहे, अशी माहिती चंदगडचे सुपूत्र स्वामी प्रतिष्ठान'चे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हिरानंदानी मेडोज परिसरातील काशिनाथ डॉ. घाणेकर नाट्यगृहानजीच्या चौकात होणाऱ्या या 'स्वामी प्रतिष्ठान' च्या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन ठाण्याचे सुपूत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. 

          तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची  प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त अनेक राजकीय नेतेमंडळी, नामवंत कलाकार मंडळी हजेरी लावणार असल्याचे आयोजक शिवाजी पाटील यांनी सांगितले.  स्वामी प्रतिष्ठान' एक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असून उत्सवासोबतचसामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी विशेषतः गरजूंसाठी कल्याणकारी योजना राबवते. संस्थेच्यावतीने याआधी कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत करण्यात आली होती. यावर्षीही नवीन उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून ७५ हजार गरजू महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे.



No comments:

Post a Comment