श्रीकांत पाटील 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2022

श्रीकांत पाटील 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पद्मश्री डॉक्टर कोल्हे दांपत्याच्या हस्ते मानाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना श्रीकांत पाटील सोबत चिरंजीव विशाल पाटील व मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे दि. १६ रोजी थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता कोल्हे दंपत्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान केला जातो. एक उपक्रमशील, चतुरस्त्र अष्टपैलू शिक्षक व  मुख्याध्यापक म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी गेल्या ३७ वर्षात विविध संघटनात्मक तसेच राष्ट्राच्या जडणघडणीसाठी सामाजिक क्षेत्रात उदात्त हेतूने केलेल्या सामाजिक कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. पाटील हे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विद्यमान कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.

         पुरस्कार वितरणाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात मेळघाट डोंगर रांगांतील आदिवासी बांधवांसाठी आयुष्य वेचलेल्या समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्यासह आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल प्रशिक्षक अशोक दाभोळकर, गोव्यातील प्रख्यात जादूगार प्रेमानंद, संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे, सिने अभिनेत्री रिया पाटील, स्वाती पवार, संयोजक डॉ. बी. एन. खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. आभार कृष्णा बामणे यांनी मानले.

No comments:

Post a Comment