चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायतीने माणसं बघून कारवाई न करता शहरातील सर्व नागरिकांना एकच नियम लागू करावा. विकासासाठी आमचे नेहमीच नगरपंचायतीला सहकार्य आहे. त्यानुसार गावातील इतर ठिकाणी सार्वजनिक गटाराच्या बाहेर आलेली सर्व अतिक्रमणे काढावीत. अशी मागणी संतोष नारायण गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ``चंदगड गावातील गटारी पासून पुढे असलेली अतिक्रमणे त्वरित काढण्याचे आदेश नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले व त्याची सुरवात माझ्या घरापासून केली. माझ्या घरासमोर रस्ता संपलेला आहे. तेथून पुढे कोणतीच वाहतूक होत नाही. म्हणून गटारीच्या पुढे दोन फुट तात्पुरते पत्रा शेड उभे केले होते. ते अतिक्रमण असल्याचे नगरपंचायतीच्या निदर्शनास आले. ते काढण्यासाठी बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांनी येवून अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले. पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतर मी स्वतः दोन फुट पत्रे कापून घेतो असे सांगितले. मात्र ते न मानल्याने मी चार दिवसात पत्रा शेड मी स्वतः काढून घेतले. नगरपंचायतीच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना एकच नियम लागू करुन अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
No comments:
Post a Comment