मलगेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2022

मलगेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मलगेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जेष्ठ नागरिक

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

           75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मराठी विद्यामंदिर मलगेवाडी (ता. चंदगड) येथे 10 वी च्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यास आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद शिवगोंडे होते.

       यावेळी पोलीस पाटील  धोंडीबा पाटील, बाबुराव गुडुळे, मुख्याध्यापक महादेव नाईक, शिक्षिका श्रीमती सुनंदा राऊत, आशा सौ. जाधव, मदतनीस सौ. लता, शाळा व्य. समिती माजी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, शाळा. व्य. समिती अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष यशवंत नाईक, सर्व  ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका सौ. कबाडे,  श्रीम. ताम्हणगोंडे, स्वयंपाकी  सुगंधा पाटील यांच्यासह या कार्यक्रमाला  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment