वैष्णवी कदम हिचा सत्कार करताना शिक्षक. |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी युवराज कदम हिचा गंगा माता शिक्षण प्रसारक मंडळ न संचलित ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी (ता. गडहिंग्लज) मार्फत घेतलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर चंदगड तालूकास्तरीय स्पर्धामध्येही वैष्णविने प्रथम क्रमांक मिळविला. स्वातंत्रदिनी चंदगड येथे तिचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. वैष्णविच्या या यशाबद्दल प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांचा हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बी. व्ही. हिशेबकर, पी. के. पाटील, आय. वाय. गावडे, एस. के. पाटील, एस. एन. पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment