कानूर खुर्द ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या घंटागाडीचे लोकार्पण करताना लोकप्रतिनिधी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कानूर खुर्द (ता. चंदगड) ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या निधीतून ही गाडी मंजूर झालेली घंटागाडी प्रदान करण्यात आली. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील अध्यक्षस्थानी होते.
सरपंच निवृत्ती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठे गाव असून, नेत्यांकडून विकासकामांसाठी नेहमीच सहकार्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सचिन बल्लाळ म्हणाले, "कानूरखुर्द येथे आठवडा बाजार भर कोकण सीमेवरील हा सर्वात मोठा बाजार आहे. अशी गावे स्वच्छ, सुंदर रहावी यासाठी या गावासाठी घंटागाडी मंजूर केली होती."
या वेळी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, ग्रामसेवक श्री. नाडेकर, अशोक पाटील, पोलिसपाटील भैया बांदेकर, सागर पाटील, रवींद्र बिरजे, अर्जुन बिरजे, दिलीप पाटील, डॉ. परशराम गावडे, मुरलीधर बल्लाळ, विजय इलगे, विजय गुरव, विनायक पाटील, ओमकार बांदेकर, दीपक पाटील, गुरुनाथ बल्लाळ, हरिभाऊ पाटील, पप्पू सोनल आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment