स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य हर घर झेंडा बाबत जनजागृतीसाठी शुक्रवार दिनांक १२/०८/२०२२ रोजी चंदगड नगरपंचायत व तहसिल कार्यालय चंदगड यांचे संयुक्त विद्यमाने सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचेसह जनजागृती रॅली काढणेत आली सदर रॅलीचे उद्घाटन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅलीचे सुरुवात तहसिल कार्यालया येथून सुरु करून शहरातील प्रमुख मार्गावरून पंचायत समिती कार्यालय येथे समारोप करणेत आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य नगरपंचायत इमारतील तिरंग्यामध्ये विद्युत रोषणाई करणेत आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आई आबा फौंडेशनचे अध्यक्ष व चंदगड अर्बन चेअरमन दयानंद काणेकर यांनी शहरातील नागरिकांसाठी १००० झेंडे देवून सामाजिक बांधिलकी जपली दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वजारोहन कार्यक्रम शनिवार दिनांक १३/०८/२०२२ रोजी जेष्ठ माजी सैनिक नेमाजी लक्ष्मण गवस यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले. दिनांक १४/०८/२०२२ रोजी नगरपंचायत चंदगडचे उपनगराध्यक्ष फिरोज अब्दुलरशीद मुल्ला यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले. सोमवार दिनांक १५/०८/२०२२ ध्वजारोहन चंदगडच्या प्रथम नागरीक चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर यांचे हस्ते करणेत आले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे शहीद झाले त्या सर्व स्वातंत्र्य विरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य चंदगड नगरपंचायतीचे वतीने रोहिदास नगर येथे वृक्षारोपण करणेत आले. शहरातील सर्वोदय वाचनालय मार्फत रक्तदान शिबीर तसेच ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. ध्वजारोहन कार्यक्रमासाठी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी तसेच कुमार कन्या व उर्दू शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका सर्व शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दिनांक १७/०८/२०२२ रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच शहरातील नागरीकांच्या सहभागाने सामुहीक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
No comments:
Post a Comment