स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, सुरुते ग्रामपंचयतीचा आदर्शवत उपक्रम, काय आहे....... - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2022

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, सुरुते ग्रामपंचयतीचा आदर्शवत उपक्रम, काय आहे.......

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

     प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरुते (ता. चंदगड) ग्रामपंचयातीच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत आदर्श पुरस्कार विजेते  सरपंच मारुती गंगाराम पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उत्सवाचे  औचित्य साधून दि. 13, 14 व 15 तारखेला सामाजिक बांधिलकी जपत  ध्वजारोहणाचा बहुमान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कायक्रमांतर्गत 13 तारखेला ध्वजारोहण गावातील आजी व माजी सैनिक यांना बहुमान देत त्यांचे प्रतिनिधी  ज्येष्ठ माजी सैनिक विठ्ठल गावडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

       दि. 14 रोजी गावातील महिलांचा सन्मान राखत प्रातिनिधिक स्वरूपात माजी उपसरपंच कै. नागोजी गंगाराम नाईक यांच्या पत्नी श्रीम. लक्ष्मी नागोजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 15 ऑगस्ट रोजीचा बहुमान गावातील दिव्यांग व विशेष  व्यक्तींना सन्मान देत प्रतिनिधिक स्वरूपात इ. 6 वी मध्ये शिकत असलेली दिव्यांग मुलगी कु. नंदिनी यलाप्पा नाईक  हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोरोना काळात मनोभावे सेवाभाव जपून उत्तम कामगिरी केलेल्या कोविड  योध्याचा तसेच गावातील  सर्व माजी सैनिक यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला.



No comments:

Post a Comment