होसूर येथे टी स्टॉल फोडून दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2022

होसूर येथे टी स्टॉल फोडून दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास

 होसूर : चोरट्यांनी फोडलेला टी स्टॉल.

कागणी :  सी. एल. वृत्तसेवा

          होसूर (ता. चंदगड) येथील महाराष्ट्र कर्नाटक राज्य हद्दीवर असलेल्या चहाचे दुकान सोमवारी मध्यरात्री फोडून दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे परिसरातील हॉटेल चालकांमध्ये चोरट्यांची पुन्हा भीती आहे. होसूर येथील टी स्टॉल चालक शशिकांत संभाजी पाटील यांनी दोन महिन्यापूर्वी येथे चहाचे स्टॉल सुरू केले आहे. सोमवारी रात्री मद्यरात्रीनंतर चोरट्यानी या टी स्टॉलचे दरवाजा मोडून आतील सिलेंडरची टाकी, विविध साहित्यांच्या बरण्या, सिगारेट पाकिटे, बिस्किटे तसेच गोड पदार्थ असे मिळून दहा हजार रुपयांचे साहित्य लंपास केले.

No comments:

Post a Comment