श्रीकांत पाटील यांना 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' पुरस्कार, पुरस्कार वितरण उद्या बेळगावात - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2022

श्रीकांत पाटील यांना 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' पुरस्कार, पुरस्कार वितरण उद्या बेळगावात

श्रीकांत पाटील


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाडचे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री ता. चंदगड) यांना 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

           शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान केला जातो. श्रीकांत पाटील हे उपक्रमशील, चतुरस्त्र व अष्टपैलू शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी गेल्या ३७ वर्षात विविध संघटनात्मक तसेच राष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक क्षेत्रात उदात्त हेतूने केलेल्या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली असून त्यांना या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

             पुरस्कार वितरण कार्यक्रम 'राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव, २०२२' बॅनर अंतर्गत लोकमान्य रंगमंदिर, रिझ टॉकीज कोनवाळ गल्ली बेळगाव येथे मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment