सुभेदार मेजर रमेश गावडे यांचा सन्मान करताना आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सेवानिवृत्त सुभेदार मेजर रमेश धानू गावडे (Indian Army) गाव कोदाळी (ता. चंदगड) यांना आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती Suprem Commander of Armed Forces यांच्या कडून या 15 ऑगस्ट 2022 रोजी ऑनररी लेफ्टनंट रैंक जाहीर केली आहे. हा ऑनर चंदगड मधील कोदाळी सारख्या दुर्गम भागातील एका सैन्यदलाच्या निवृत्त जवानाला मिळाल्याने चंदगड वासीयांना आनंद झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज चंदगड मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सुभेदार मेजर रमेश गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांच्यासह सर्व विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment