गडकोट किल्ले संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी काअमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकानी ऐतिहासिक वारसा जपलेल्या किल्ले गंधर्वगडाची साफ-सफाई व डागडुजी मोहिम संपन्न केली.
पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या व दुरुस्तीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झालेल्या या किल्ल्याचा प्राचीन इतिहास लोप पावत चालला आहे. स्वयंसेवकानी कांहीं जुन्या जानत्या व बुजुर्ग नागरिकांकडून प्रागैतिहासिक पार्श्वभूमी जानून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तुटपुंजी माहिती हाती लागली. येथील प्रत्येक अवशेष बोलका आणि शौर्य व बलिदानाची गाथा सांगणारा आहे. त्या स्मृतिना उजाळा देवून या किल्ल्याचा दैदीप्यमान इतिहास पुढच्या पीढ़ीकड़े हस्तांतरण होणे काळाची गरज आहे.
किल्ल्याच्या स्वच्छतेमध्ये स्वयंसेवकानी झुडपे, गवत, कचरा, दगडगोटे साफ केले. प्लास्टिक, काचबाटल्या जमा करून योग्य विल्हेवाट लावली. गणेश दरवाजा, बाली किल्ला, धान्यकोठार, चोरदरवाजा, शौचकूप, प्राचीन गुफा, टेहळणी बुरूज, कुंड, तटबंदी, निसर्गाकडून सौंदर्य, प्राचीन मंदिरे, लोकवस्तीचे जीवनमान अशा अनेक गोष्टी पाहिल्या व त्यांची माहिती संकलन केली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागृत झाली.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी एनएसएस प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय एन. पाटील, समिती सदस्य प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एन. के. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, सौ प्रमिला पाटील, अजय सातर्डेकर, श्रीपाद सामंत, विक्रम कांबळे यानी विशेष परिश्रम घेतले. गंधर्वगडचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, चंदगडचे तहसीलदार, बीडीओ यांचे सहकार्य लाभले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर रासेयोजना संचालक प्रा. अभय जायभाये, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. चंदगड तालुक्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सदिच्छा भेट दिली व स्वयंसेवकाना अनमोल मार्गदर्शन केले.
तरूण युवक व ग्रामस्थांची उपस्थिती लक्षवेधक होती. स्वयंसेवकांनी संधीचे सोने करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले. प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment