आयात निर्यात प्रक्रिया माहिती असणे अत्यावश्यक - प्रकाश ढोणुक्षे - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2022

आयात निर्यात प्रक्रिया माहिती असणे अत्यावश्यक - प्रकाश ढोणुक्षे

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                  'विद्यार्थ्यांनी आज च्या युगात देश - विदेशातील बाजारपेठेचे ज्ञान आत्मसात करायला हवे आयात निर्यातीसाठी मूलभूत कागदपत्रे ,प्रक्रिया यांची माहिती घ्यावी .बदलत्या काळाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आयात निर्यात प्रक्रियेची पूर्ण माहिती असणे ही काळाची गरज आहे.' असे प्रतिपादन प्रकाश ढोणुक्षे यांनी केले. ते येथील र .भा .माडखोलकर महाविद्यालयातील व्याख्यानात बोलत होते.

            अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. एस. के. सावंत यांनी आयात निर्यातीसाठी शासकीय यंत्रणा कशा प्रकारे कार्यवाही करते याचा अभ्यास करण्याची गरज विशद केली .विद्यार्थ्यांनी बाजारपेठेचे ज्ञान घेऊन उत्पादना इतकेच विपणन व्यवहाराचेही महत्त्व लक्षात घ्यायला हवे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एस डी गोरल यांनी केले. सुनील सिंग, प्रा. एस. व्ही .कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment