मराठा सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन ११ सप्टेंबरला कुरुंदवाड येथे - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2022

मराठा सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन ११ सप्टेंबरला कुरुंदवाड येथे



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

                मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन कुरुंदवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे उद्या रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

       अधिवेशनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व बेळगाव या सहा जिल्ह्यातील मराठा सेवा संघ व त्याच्या ३३ कक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिप. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरिक्त मनपा आयुक्त मिलिंद देसाई. विक्रीकर आयुक्त समरजीत थोरात, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे उपस्थित राहणार आहेत.

            दिवसभर विविध सत्रात होणाऱ्या कार्यक्रमात बालाजी जाधव (औरंगाबाद), स्नेहा खेडेकर,  प्राचार्या उज्वला साळुंखे (सोलापूर),  प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर (मायणी), या अभ्यासू वक्त्यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.  समारोप कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड पुरुषोत्तम खेडेकर, मधुकर मेहकरे, नंदाताई शिंदे, प्रा. अर्जुन तनपुरे, अशोक पाटील (निबंधक सारथी संस्था पुणे) आदी मान्यवरांसह  प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. उपस्थित सर्वांना सकाळी ८.३० ते ९.१५ नाश्ता व चहा, दुपारी २ ते ३ जेवण, व सायं. ५.३० ते ६ चहा सोय करण्यात आली आहे. तसेच अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी परिवर्तनवादी विचारांच्या विविध पुस्तकांचे स्टॉल त्याचबरोबर महामानवांचे पोस्टर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या 'साहित्य' खरेदीचा लाभ घेता येईल.



No comments:

Post a Comment