यशवंतनगर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामार्फत निर्माल्य संकलन - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2022

यशवंतनगर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामार्फत निर्माल्य संकलनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तडशिनहाळ ग्रामस्थाांच्या सहकार्याने   यशवंतनगर येथे ताम्रपर्णी नदीवर निर्माल्य संकलन करून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला. प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य एकत्रित गोळा करण्यात आले  यावेळी तडशिनहाळ गावच्या सरपंच सौ सुजाता कदम ,उपसरपंच रामलिंग गुरव, तंटामुक्त अध्यक्ष नारायण दळवी, एकनाथ कदम,  मोहन नवगिरे,कृष्णा कदम, निवृत्ती बिरजे, परशराम करडे,निंगाप्पा गावडे,विलास पाटील पुंडलिक पाटील, सुधाकर कदम, सुभाष बिर्जे व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकार प्रा. जी जे गावडे प्रा.शाहू गावडे प्रा.अंकुश नौ कुडकर व प्रा.पुंडलिक दरेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment