चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र .भा .माडखोलकर महाविद्यालयात एम .कॉम.भाग एकची नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी बी.कॉम. भाग ३ च्या गुणपत्रिकेची प्रत अर्जासोबत जोडून विहित नमुन्यातील अर्ज महाविद्यालयास मंगळवार दि. १३ सप्टेंबर अखेर सादर करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ हवा असेल त्यांनी जातीचा दाखला जोडणे अनिवार्य असेल. प्रवेश मर्यादित असलेने दि.१३ सप्टेंबर पर्यंतच अर्ज भरणे आवश्यक आहे. दि. १५सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. दि. १७ सप्टेंबरहा प्रवेशाचा अंतिम दिनांक असेल. उशीरा प्रवेश अर्ज भरल्यास गुणवत्ता यादीवर हक्क सांगता येणार नाही.असे महाविद्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment