संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2022

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवडमहागाव / सी. एल. वृत्तसेवा

            महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली कंपनीतर्फे ऑनलाइन टेस्ट, ऑनलाइन मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना वार्षिक 4 लाख रुपये पॅकेज मिळाले. यामध्ये अवधूत गोइलकर, मोनिका पाटील, शुभम पाटील यांची इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड व अंकुर भोसले, अक्षय पवार, यांची कुबेरा मोशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच रेवती शिंदे, पुष्पा अंबुलकर, महादेवी चिमणे, अंकिता देसाई या विद्यार्थिनींची बीट सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली.

             नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यामध्ये संस्था कायमच अग्रेसर आहे याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब चव्हाण यांनी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

             या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. संतोष गुरव, प्रा. महादेव  बंदी सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले, या प्रसंगी प्रा. अमरसिंह फराक्टे, प्रा. मल्लिकार्जुन पाटील,  प्रा. प्रदिप चिधी, प्रा. राहुल देसाई, प्रा.संजिव मर्जक्के, प्रा. विरेश मठद, प्रा.अतुल देशपांडे उपस्थित होते.No comments:

Post a Comment