विद्यार्थ्यांनी नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात रहावे - डॉ. बाचूळकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंन्दी विभागातर्फे कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2022

विद्यार्थ्यांनी नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात रहावे - डॉ. बाचूळकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंन्दी विभागातर्फे कार्यक्रम

मार्गदर्शन करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           आजचा विद्यार्थी वाचनापासून दूर चालला आहे. त्यामुळे वाचनापासून मिळणारा आत्मीक आनंदास तो मुकला आहे. वाचन मनन - चिंतन या त्रीसुत्रीच्या सहाय्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होता येते. विद्यार्थी दशेतच यशस्वी जीवनाची पायाभरणी होत असते. विद्यार्थी जीवनामध्ये अनेक मोहपाश ध्येय विचलित करतात. असे मोह जाणीवपूर्वक टाळावेत. मी याच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. दौलत विश्वस्त संस्था, महाविद्यालयाचा व येथील गुरूजनांचा मी फार ऋणी आहे. अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्नपूर्ती करणारे हे महाविद्यालय आहे. असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे हिन्दी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक बाचुळकर यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हिंन्दी विभागातर्फे आयोजित 'Faculty Exchange' या कार्यक्रमातंर्गत बोलत होते.

         याप्रसंगी व्यासपीठावर हिन्दी विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील, डॉ. सी. बी. पोतदार, डॉ. ज्योती व्हटकर, प्रा. एस. डी. तावदारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. एस. एन. खरूजकर यांनी केले. आभार कु. दिक्षा पाटील यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन कु. सपना नाईक यांनी केले.

No comments:

Post a Comment