'मनसे' बैठकीत पदाधिकारी निवड, ग्रामपंचायत निवडणूक व शाखा विस्तारावर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

'मनसे' बैठकीत पदाधिकारी निवड, ग्रामपंचायत निवडणूक व शाखा विस्तारावर चर्चा

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकिस उपस्थित असलेले मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

         महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पार पडली. संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

       बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुका, नवीन शाखांचे उद्घाटन, जिल्हा व विविध तालुक्यातील कार्यकारणी विस्तार करणे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे आदी विषयांवर चर्चा झाली. ज्या कार्यकर्त्यांना पदावर काम करायची इच्छा असेल त्यांनी लेखी स्वरूपात जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्याकडे लेखी अर्ज द्यावे असे ठरले. कामाचा अहवाल पाहून नियुक्त्या करण्यात येतील असे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेले  विवेक पाटील, विवेक माणगुतकर, अमर कांबळे, नितेश नाईक, सत्वशील पाटील, बाळासाहेब पाटील, तुकाराम पाटील, सुरज धाटोंबे, रमेश पाटील, अमर प्रधान, शरद पाटील, संजय मुळीक, सतीश भोसले, सतीश निकम, अविनाश पाटील, शुभम कालेलकर,  विराज गावडे, शुभम किरमते, पवन अमृस्कर, मयूर पाटील, पराग पाटील, अमित निंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment