महादेव चौगुलेची छत्तीसगड मध्ये दमदार कामगिरी,बांबु उडीत मिळवले सुवर्णपदक - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

महादेव चौगुलेची छत्तीसगड मध्ये दमदार कामगिरी,बांबु उडीत मिळवले सुवर्णपदक

बांबू उडी खेळाडू महादेव चौगुले यांचा महागाव येथे सत्कार करून गुहाटी येथील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महागाव : सी. एल. वृत्तसेवा

             महागाव (ता. गडहिंग्लज) येथील बांबू उडी खेळाडू महादेव शिवाजी चौगुले यांने आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा झेंडा छत्तीसगडमध्ये रोवला आहे. महादेव याने छत्तीसगढ येथे झालेल्या बांबू उडी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावण्याचा महापराक्रम केला आहे. त्याची गुवाहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल  महागाव येथे शिवसहकार सेना तालुका संघटक अखलाकभाई मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवानिवृत्त पीएसआय पांडूमामा चौगुले, कुपटे सर, किरण कांबळे, प्रवीण शिंदे, सचिन मुळीक, ओके-ओके मंडळचे अध्यक्ष विवेक शिंगटे, विजय पांचाळ, समीर हावळे, निलेश पुंडपल, भैया लाड, विनय जावळे, मुन्ना हबीब, सागर झोकांडे, अक्षय महंत आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment