नवरात्र उत्सवानिमित्त नागरदळेत विविध कार्यक्रम, जय दुर्गामाता युवक मंडळाच्या वार्षिक सभेत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

नवरात्र उत्सवानिमित्त नागरदळेत विविध कार्यक्रम, जय दुर्गामाता युवक मंडळाच्या वार्षिक सभेत निर्णय

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

             नागरदळे (ता. चंदगड) येथील नवरात्र मंडळाची बैठक रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजता गावातील हनुमान मंदिर येथे उत्साहात पार पडली. सभेमध्ये  नवरात्र मध्ये येणाऱ्या कार्यक्रम संदर्भात नियोजन ठरविण्यात आले.

        लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा, महिलांसाठी  हळदीकुंकू समारंभ सोहळा, झिम्मा फुगडी, पारंपरिक खेळ तसेच रासदांडीया गरबा नृत्य असे कार्यक्रम राबविण्यात येणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  पुंडलिक नारायण पाटील यांनी केले आहे. 

        सभेला मंडळाचे पदाधिकारी प्रा. चंद्रकांत गुरव, नवनाथ कोकितकर, शिवाजी पाटील, हणमंत पाटील, रामचंद्र पाटील, मारुती पाटील, तुषार मन्नूरकर, अमर पाटील, दत्तू पाटील, शिवाजी सुतार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment