मराठा सेवा संघाची ४ डिसेंबर २०२२ रोजी गारगोटी येथे सभा - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2022

मराठा सेवा संघाची ४ डिसेंबर २०२२ रोजी गारगोटी येथे सभा


गारगोटी: सी. एल. वृत्तसेवा 

         मराठा सेवा संघ व अन्य कक्षांची संयुक्त सभा रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह, चव्हाण हॉस्पिटल, दुसरा मजला, एस. टी. स्टॅंडजवळ, गारगोटी (ता. भुदरगड) येथे होणार आहे.      

        मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासनाकडे प्रलंबित मागण्या, शैक्षणिक, नोकरी व व्यवसाय विषयक विविध योजनांची माहिती तसेच अंमलबजावणी याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे.  भुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज, कागल  तालुक्यांसाठी मराठा सेवा संघ व अन्य कक्षांचे तालुका व स्थानिक स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडीबाबत मुलाखती होणार असून मराठा सेवा संघाच्या विचारांशी सहमत असलेल्या व संघटनेचे काम करणेस इच्छुकांसह सर्व मराठा बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

       सभेनंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असलेने जिल्हा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई आदींनी केले आहे.

             

No comments:

Post a Comment