संत गजानन' मध्ये हृदयविकार रुग्णांकरिता कार्डिॲक सेंटरची सुरुवात, स्वतंत्र अतिदक्षता विभाग; शासकीय मोफत योजना मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2023

संत गजानन' मध्ये हृदयविकार रुग्णांकरिता कार्डिॲक सेंटरची सुरुवात, स्वतंत्र अतिदक्षता विभाग; शासकीय मोफत योजना मंजूर

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशलिटी रुग्णालयात  हृदयविकार रुग्नाच्या चिकित्सा व उपचारासाठी स्वतंत्र कार्डिॲक  सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी अत्याधुनिक मशीन सह स्वतंत्र कॕथलॕबची उभारणी केला असून प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर टीम चोवीस तास येथे उपलब्ध असणार आहेत तसेच ॲजिंओग्राफी व ॲजिंओप्लास्टी साठी शासनाच्या  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व कर्नाटकचे सुवर्ण आरोग्य योजनेला मंजूरी मिळाल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.
  गेली पंचवीस वर्षे गरजू व सर्वसामान्यांच्या उपचाराकरिता संत गजानन महाराज रुग्णालय नामांकित रुग्णालयापैकी एक आहे. या विभागातील हृदयविकार रुग्णांची गांभीर्य ओळखून सामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी या सेंटरची सुरुवात केला आहे. नुकताच या सेंटर मधून ट्रिपल वेसल असलेली अवघड व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश मिळाला आहे. यासाठी नामवंत डॉ. रमेश माळकर यासह इतर तज्ञ डॉक्टर्स व परिचारिकेच्या टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माळकर हे एमबीबीएस कृष्णा मेडिकल सायन्स (कराड )डीएनबी मेडिसिन कोचीन (केरळ) तर डीएनबी कार्डिओलॉजी पुट्टप्रती (आंध्र प्रदेश) येथे शिक्षण पूर्ण करुन दहा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पंधराहजार  अँजिओप्लास्टी तर तीस हजार हून अधिक अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी केला आहे. याबरोबरच डॉ. प्रियांका पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सुशांत पाटील यासह इतर डॉक्टरची टीम येथे उपलब्ध असणार आहे तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केला आहे.



No comments:

Post a Comment