ध्येयपूर्तीसाठी आंतरीक शक्ती जागृत करा : प्रा डॉ. जरळी, हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत स्वामी विवेकानंद जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2023

ध्येयपूर्तीसाठी आंतरीक शक्ती जागृत करा : प्रा डॉ. जरळी, हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत स्वामी विवेकानंद जयंती साजरी


चंदगड/प्रतिनिधी
कोणत्याही कामासाठी एकाग्रता महत्वाची असते. एकाग्रतेतून आपण महाविद्यालयीन जिवनात  यशस्वी होवू शकतो. आपल्यामधे आंतरिक शकती जागे झाली तर आपण ध्येयाने प्रेरित होऊन कष्ट करतो.  स्वामी विवेकानंद हे एक महान अध्यत्मीक गुरु तसेच समाज सुधारक होते त्यांचे विचार विद्यार्थी आणि तरुण वर्गासाठी प्रेरणादायी आहेत. आयुष्यात यश प्राप्तीसाठी त्यांचे विचार आत्मसात करा" असे प्रतिपादन प्रा डॉ आय आर जरळी यांनी केले . दौलत विश्वस्थ संस्था हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविधालयात इंग्रजी विभाग मार्फत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयाजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविधालयाचे माजी प्र प्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. पी ए पाटील उपस्थित होते. 
      प्रारंभी प्रा एस ए पाटील यांनी स्वागत केले
 प्रास्ताविक प्रा. व्ही व्ही कोलकार यांनी केले.स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा पी ए पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सर्वांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
डॉ. जरळी पुढे म्हणाले,स्वामी विवेकानंद यांचे विचार आपण स्वतःमध्ये अंगिकारले तर यश नक्की मिळेल"
याप्रसंगी प्रा पी ए पाटील यांनी ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा डॉ. अर्जुन पिटूक यांनीही आपले विचार मांडले. 
यावेळी प्रा ए एस बागवान, प्रा एस एन खरुजकर, प्रा.डॉ . आर ए घोरपडे, प्रा एस एन पाटील, डॉ. ए व्ही दोरुगडे, प्रा एस पी घोरपडे, प्रा एन  के जावीर, प्रा ए एस जाधव,  डॉ. एस आर वायकर, बी  बी नाईक, सुधीर गिरी,गोकुळ मोरे,नंदकुमार बोकडे, ए एम मकानदार,युवराज रोड  सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा व्ही व्ही कोलकार यांनी केले तर आभार प्रा एस ए पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment