हक्काच्या घरांसाठी चंदगडकरांना आता आजरा जनता गृहतारण संस्थेचा आधार : भरमुअण्णा पाटील, पाटणे फाटा येथे संस्थेच्या शाखेचे उद्घाटन थाटात, अशोकअण्णा चराटी यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2023

हक्काच्या घरांसाठी चंदगडकरांना आता आजरा जनता गृहतारण संस्थेचा आधार : भरमुअण्णा पाटील, पाटणे फाटा येथे संस्थेच्या शाखेचे उद्घाटन थाटात, अशोकअण्णा चराटी यांची उपस्थिती

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे फित कापून शाखेचे उद्घाटन करताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, शेजारी शोकअण्णा चराटी, संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          आपल्याला संस्कृतीसंपन्न घर उभे करण्यासाठी प्रत्येक नोकरदार वर्ग आयुष्यभर झटत असतो. आयुष्यभराची पुंजी तो आपल्या घरासाठी पणाला लावतो, अशावेळी आता चंदगडकरांच्या हक्काच्या घरासाठी आधार बनून आली आहे, ती संस्था म्हणजे  आजरा  येथील जनता गृहतारण  संस्था होय. या संस्थेला मोठ्या विश्वासाने सहकार्य करू,  असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी व्यक्त केले.

       या संस्थेच्या शाखेचे पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे भरमुअण्णा पाटील व अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे होते.

पाटणे फाटा : शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील. शेजारी अशोकअण्णा चराटी, संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे  व अन्य मान्यवर

        यावेळी अशोकअण्णा चराटी म्हणाले, ``सहकारामध्ये आजरा तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संपूर्ण राज्यांने आदर्श घ्यावा, असे काम जनता गृहतारण संस्थेचे आहे. चंदगडमध्ये सुद्धा  ही संस्था एक वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास आहे. अण्णाभाऊ संस्था समूहाचा एक घटक म्हणून आम्ही सदैव संस्थेच्या पाठीशी ठामपणे आहोत. संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा देताना ते म्हणाले की जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा होतील, याचा आम्हाला विश्वास आहे. 

          अध्यक्षस्थानावरून मारुती मोरे म्हणाले, ``आमची जनता सहकारी गृहतारण संस्था ही सहकार क्षेत्रातील अग्रगन्य संस्था असून चंदगडकरांचा विश्वास सत्कारणी लागेल. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळवणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेच्या आजरा मुख्य कार्यालयाबरोबर गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी आणि सांगली असा शाखा विस्तार आहे. गडहिंग्लज आणि कोल्हापूर शाखेचे कामकाज व स्व मालकीच्या इमारतीमध्ये सुरू आहे. लवकरच कराड आणि सातारा येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू होतील. आरटीजीएस, एनईएफटी, क्यू आर कोड स्कॅन, एस एम एस सुविधा सह वीज बिल भरणा करण्याची सोय देखील आम्ही उपलब्ध करून दिली आहे. 

        संस्थेमार्फत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना घर खरेदी, घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो, तर प्लॉट खरेदी करण्यासाठी 75 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. गृह कर्जाच्या परतफेडच्या हप्त्यांना व्याज व मुद्दल आयकर सवलत दिली जाते. शिवाय कर्जाचा हप्ता कर्जदाराच्या पगारातून कपात होत असल्याने कर्जाची वसुली शंभर टक्के होते. त्यामुळे ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित आहेत. संस्थेकडे सध्या 71 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ठेवतारण कर्ज योजना, सोने तारण कर्ज योजना,  कॉल डिपॉझिट मुदत बंद, दाम दुप्पट, रिकरिंग बचत ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना अशा विविध आकर्षक व्याजदरच्या ठेवी योजना सुरू आहेत. 

        कार्यक्रमाला आर. पी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. डॉ. दीपक पाटील, मोहन परब, शामराव बेनके, आर. आय. पाटील, पाटणे फाटा शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक  दोरुगडे, राजाराम पाटील, डॉ. विजय पाटील, मजरे कार्वे येथील सरपंच शिवाजी तुपारे, तावरेवाडीच्या सरपंच माधुरी कागणकर, मुरकुटेवाडीच्या सरपंच शुभांगी मुरकुटे, प्रदीप पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, प्रा. तानाजी कावळे, प्रा. बळवंत कडबाळे, प्रा. मनोज देसाई, प्रा. आनंद बल्लाळ, ॲड. सुभाष डोंगरे, प्रा. लता शेटे, प्रा. नेहा पेडणेकर, जनरल मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार यांच्यासह सर्व शाखा चेअरमन व संचालक तसेच शाखा कर्मचारी सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक  बाचुळकर यांनी केले. 

No comments:

Post a Comment