गावच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवा : आम. प्रकाश आबिटकर, भादवण येथे विजयी मेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

गावच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवा : आम. प्रकाश आबिटकर, भादवण येथे विजयी मेळावा उत्साहात

भादवण (ता. आजरा) येथे नवनिर्वाचित सरपंच जयश्री खाडे, उपसरपंच संजय पाटील यांचा सत्कार करताना आम प्रकाश आबिटकर

उत्तूर / सी. एल. वृत्तसेवा 

     निवडणूकीत जय पराजय होत असतात. गावच्या विकासासाठी सत्तारूढ व विरोधक यांनी गावच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवा असे प्रतिपादन आजरा - भुदरगडचे आमदार  प्रकाश आबिटकर यांनी भादवण (ता. आजरा) येथे शिवसेना प्रणीत युवा शेतकरी विकास पॅनेलचा विजयी मेळाव्यात  बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच माधुरी गाडे होत्या.

        नवनिर्वाचित सदस्य,  सरपंच  गाडे, उपसरपंच संजय पाटील, अर्जुन कुंभार, प्रमोद घाटगे, बाळकृष्ण सुतार, तानुबाई देवरकर, सुनंदा पाटील , संगीता देसाई, अश्विनी पाटील आदींचा  सत्कार आम. आबीटकर यांच्या  हस्ते झाला.

         गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, विकास सेवा संस्था चेअरमन पी. के. केसरकर, व्हा. चेअरमन रुक्मीणी पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी कुंभार, जनता जनार्दन सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिव भिवा गोईलकर, ज्ञानदेव पाटील, तानाजी कदम, माजी सरपंच दत्तात्रय शिवगंड, बेबीताई लोहार, बाळासाहेब कुंभार, रणजित गाडे, सुनिल मुळीक, संदीप सुतार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयानंद पाटील  यांनी तर  पी. के. केसरकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment