गिरणी कामगारांच्या मुंबईतील घरांचे प्रश्न सोडवा, गिरणी कामगारांची भाजपाकडे निवेदनाद्वारे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

गिरणी कामगारांच्या मुंबईतील घरांचे प्रश्न सोडवा, गिरणी कामगारांची भाजपाकडे निवेदनाद्वारे मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोल्हापुर जिल्हासह राज्यातील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पांडुरंग नेवगे  यांनी भाजपचे राज्य कार्यकारीणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे. 

       निवेदनात  चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागासह कोल्हापुर जिल्हातील गिरणी कामगारांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक गिरणी कामगार मयत असुन झाले असुन त्यांच्या वारसांचा देखील घरांचा प्रश्न अनुत्तरित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातून तात्काळ हा विषय मार्गी लावुन गिरणी कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी नेवगे यांनी निवेदनद्वारे केली आहे. 

       निवेदनावर सत्तूराम कोले, धोडिबा घोळसे, राजाराम पाटिल, भिकाजी कोले, कृष्णा भादवनकर, जेरोन गॉडद, रामचंद्र दोरुगडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, धोडीबा  घोळसे, संदीप आर्दाळकर, संतोष पाटील व अशोक कलम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment