सुलोचना चिंदके यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

सुलोचना चिंदके यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर

सौ. सुलोचना अशोक चिंदके

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

 क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या जीवन शिक्षा मंदिर वडरगेच्या मदत अध्यापिका सौ. सुलोचना अशोक चिंदके यांना सामाजिक बांधिलकी मानून ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
        राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार समारंभ रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. मंचकराव डोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. अकबर मकानदार, निती उराडे, प्रा. प्रकाश नाईक या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment