बुलेट गाडी झाडाला धडकून एक जण ठार, एक गंभीर जखमी,सुपे नजिक घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

बुलेट गाडी झाडाला धडकून एक जण ठार, एक गंभीर जखमी,सुपे नजिक घडली घटना

 

 ओमकार उत्तम मोरे    (मयत)

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

बेळगाव - वेंगुर्ला राजमार्गावर सुपे ता.चंदगड गावच्या हद्दीत राॅयल इनफिल्ड बुलेट गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर  झाला.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचार  वाजता झाला. ओमकार उत्तम मोरे (वय वर्ष २५, धंदा-शिक्षण, रा. यमगर्णी ता.निपाणी जि.बेळगांव) असे मयत युवकाचे नाव आहे. ओमकार सुरेश संकपाळ (रा. सदलगा ता. चिकोडी जिल्हा- बेळगाव, राज्य-कर्नाटक) असे जखमी युवकाचे नाव आहे.

ओमकार सुरेश संकपाळ.   (जखमी)

     याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी की मयत ओमकार मोरे हा आपल्या चार मित्रासह फिरण्यासाठी मालवण जि.सिंधुदूर्ग येथे आपल्या दुचाकीवरून जाणेसाठी निपाणी येथुन निघून चिकोडी (ता. चिकोडी जि.बेळगांव, राज्य-कर्नाटक) येथे राहणारा त्यांचा मित्र वैभव सुभाष आळगुंडे यांस बेळगांव येथून घेवून ते ५ मित्र ओमकार उत्तम मोरे हा त्याची रायल इनफिल्ड कंपनीची मोटर सायकल नं  MH 12 LE 9095 या दुचाकी वाहनावर ओमकार सुरेश संकपाळ यास बसवुन  हे बेळगाव ते वेंगुर्ला रोडणे जात असतांना ते सर्वजण वरिल तारखेस वेळी व ठिकाणी आले असता ओमकार मोरे याचे आपल्या बुलेट गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने, रोडचे साईड पटटीवर असलेल्या झाडाला धडकली. या मध्ये मोरे जागीच ठार झाला. त्याचे पाठीमागे बसलेला  ओमकार सुरेश संकपाळ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहे. मयत ओमकार मोरे याचे शव विच्छेदन करून मृतदेह रात्री उशीरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोहेकॉ सुतार करत आहेत.
No comments:

Post a Comment