पाटणे फाटा येथे सोमवारी रेशीम प्रशिक्षण कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

पाटणे फाटा येथे सोमवारी रेशीम प्रशिक्षण कार्यशाळा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर व सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इंकूबेशन इन सेरीकल्चर शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सोमवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत रेशीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

      या कार्यक्रमासाठी प्रधान शास्त्रज्ञ राष्ट्रीय मुद्रा सर्वेक्षण नागपूरचे डॉ. त्रिलोक हजारे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, विभागीय संचालक डॉ. अधिकराव जाधव, सेरीकल्चर समन्वयक डॉ. एच. आर. यंकंची, तहसीलदार विनोद रणावरे, रेशीम विकास अधिकारी आर. जी. कांबळे, वरिष्ट तांत्रिक सहाय्यक  डॉ. बी. एम. खंडागळे, रेशीम वरिष्ठ अधिकारी गडहिंग्लज चे ए. एम. संकपाळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील रेशीम उद्योजकांनी वेळेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment