कोदाळी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

कोदाळी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोदाळी (ता. चंदगड) येथील शिवाजी वामन गावडे (वय वर्षे ४७) या युवकाने जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

  कोदाळी गावच्या हद्दीत असलेल्या आपट्याचे माळ नावाच्या जंगलातील हिरड्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गुरूवारी (१९ जानेवारी) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गळफास लावुन घेवुन शिवाजी गावडे याने आत्महत्या केली. याबातची वर्दी वामन शिवाजी गावडे यानी चंदगड पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे करत आहेत.

No comments:

Post a Comment