राष्ट्रीय सणाला मोफत इस्त्री करून देण्याचा उत्तूरच्या गंगाधर परीटांचा संकल्प ! - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

राष्ट्रीय सणाला मोफत इस्त्री करून देण्याचा उत्तूरच्या गंगाधर परीटांचा संकल्प !

इस्त्री करताना गंगाधर परीट

आजरा / सी. एल. वृतसेवा

        उत्तूर (ता. आजरा) येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत इस्त्री करून देण्याचा संकल्प उत्तूर येथील गंगाधर परीट (वय - ६५) यांनी घेतला असून परीट यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

          स्वातंत्र दिन व प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी हे शालेय गणवेश घालून शाळेस जात असतात. यावेळी कपड्यांना इस्त्री नसल्याने मुलांच्यात नाराजी व्यक्त होते. संगळ्याच्या घरी इस्त्री अथवा इस्त्री करून घेण्यास पैसे नसतात. अशा सर्व  विद्यार्थ्यांना इस्त्री मोफत करून देण्याचा परीट यांचा मानस आहे.

           परीट कुटुंबातील गंगाधर परीट नोकरीसाठी पुणे येथे गेले होते. नोकरीमध्ये त्याने ठिकठिकाणी स्वंयपाकी म्हणून काम केले. काम करीत असताना त्यांनी वडिलोपार्जित व्यवसायकडे दुर्लक्ष केले नाही. पुण्याच्या तळोजा येथे औद्योगिक महामंडळात काम करत असताना सायंकाळच्या वेळी त्याने आपल्या व्यवसायाकडे मन वळवले. व्यवसाय सांभाळत मुले, सुना यांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर केले आहे.  वयाच्या पासष्टीत ते उत्तमपणे काम करीत असून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment