कोवाड कॉलेजचे शरीर शौष्टव स्पर्धेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2023

कोवाड कॉलेजचे शरीर शौष्टव स्पर्धेत यश

 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

           कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील दोन विध्यार्थ्यानी गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आयोजित अंतर विभागीय शरिर सौष्ठव स्पर्धेत रोहित राजू भोगण बी कॉम-३ याने ७५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. 

          ६५ किलो वजनी गटात अनिल आनंद मोहनगेकर बी ए -१ याने द्वितीय क्रमांक मिळविला. यशस्वी खेळाडूना क्रिडा संचालक प्रा. आर. टी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील व प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी दोन्ही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment