बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2023

बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची भेट


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रलंबित कामाबाबत चर्चा केली. तहसिलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, यासह बांधकाम अभियंता, महावितरण, कार्यालयातील अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध विषयावर चर्चा केली. 
       बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख कलाप्पान्ना निवगीरे, उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरीकर, उपतालुकाप्रमुख दत्ता पाटील, अशोक मोहिते, मनोहर पाटील,  युवासेना तालुका प्रमुख तुकाराम पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख किरण कोकीतकर, ओ. बी. सी. सेलचे तालुका प्रमुख मारूती पाथरूट, बांधकाम कामगार सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश बागडी, शिवाजी नाईक, महिला तालुका प्रमुख सौ. पुनम पाटील, सौ. छाया कांबळे, बंडू गुडेकर, संभाजी पाटील, पुंडलिक पाटील, संतोष कदम, राजू मनगुतकर व शिवसैनिक उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment