सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांची गडहिंग्लज येथे बैठक संपन्न, विविध विषयांवर झाली चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2023

सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांची गडहिंग्लज येथे बैठक संपन्न, विविध विषयांवर झाली चर्चा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड-आजरा-गडहिंग्लज तालुक्यातील सेवानिवृत्त एस. टी. निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व इतर प्रलंबित पप्रश्नाबाबत गडहिंग्लज येथील राममंदिर मध्ये बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी व्ही. बी. देशपांडे होते. प्रारंभी एस. टी. मधून सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रध्दाजली वाहण्यात आली. स्वागत सुरेश मोरे यांनी केले. 

         यावेळी विभागीय सचिव बाबासाहेब कोकणे यांनी पेन्शन संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे कोणते फायदे व तोटे आहेत यांची सविस्तर विश्लेषन करून न्यायालयाने ४ महिन्याची माहिती देणेबाबत वेळ दिला असून त्यातील अडीच महिने झाले. पेन्शन विभागाने अद्याप कोणतीही माहिती अर्ज फार्म संबधी कायार्लयांना परिपत्रक दिले गेले नाही. त्यामुळे काही लोक विशिष्ट नमुन्याचे फार्म भरत असून त्या फार्मशी आपल्या एस. टी. निवृत्त कर्मचारी संघटनेचा कोणताही संबंध नाही. अगर एस. टी. महामंडळाने पेन्शन विभागाने फार्म वितरीत केले नसल्याने ते फार्म भरून आपली फसगत होवू देवू नका. अध्यक्ष कमलाकर रोटे यांनी पेन्शन संदर्भात ७ डिसेंबर रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे आपल्या कोल्हापूर विभागाचे २०० पेक्षा जास्त कर्मचारी उपस्तीत होते. सदरचे आंदोलन कशा प्रकारे झाले तेही सांगितले. येत्या काही दिवसात पेन्शन संदर्भात निर्णय न झाल्यास बजट अधिवेशनावेळी दिल्ली येथे पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यातूनही केंद्र शासनाने कार्माच्यार्यांची दाद न घेतल्यास येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत कर्मचारी कोणतेही निर्णय घेवू शकतात. कारण असे कर्मचारी देशात ६७ लाख असून सर्व संघटनांचा पेन्शन हा एकाच विषय आहे. ९० पार केलेले जुने कामगार नेते एन. जी. कुलकर्णी यांनीही उपस्थित राहून संघटने बाबत माहिती दिली. 

            गेल्या अधिवेशानामध्ये खासदार सुप्रिया सुळे, प्रेमचंद (केरळ) तामिळनाडूचे खासदार यांनी पेन्शन संदर्भात कार्माच्यार्यांची बाजू उचलून धरली त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या सर्व खासदारांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने निवृत्त कार्माच्यार्याना ६ महिन्याचा मोफत पास जो देण्यात आलेला आहे तो १२ महिने करण्यात यावा व सदर कर्मचार्यांना प्रवेश देण्यात यावा. मृत्यू कर्मच्याऱ्यांच्या पत्नीला पासची वयाची अट रद्द करून त्यांनाही कायमस्वरूपी पास देण्यात यावा. या मागण्या पुर्णत्वास नेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. बैठकीला प्रशासकीय, चालक, वाहक, कार्यशाळा व वाहतूक नियंत्रक असे १५० कर्मचारी उपस्थित होते. शेवटी गडहिंग्लज, आजरा, चंदगड या विभागासाठी नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली असून अध्यक्ष व्ही. बी. देशपांडे, शी. जी. पालकर, सचीव बाबासाहेब देसाई कार्याध्यक्ष आर. एल. यादव, सहसचिव, व्ही. एन. केसरकर, सहसचिव बी. डी. वाजंत्री खजिनदार अशी निवड करण्यात आली. सदर मिटींगला निशिकांत कोकिळे, एम.एल.बिद्रेवाडकर, ए.एफ. मुल्ला, भेंडूलकर, दत्ता कासार, डी.एल. मुगळीकर, हुक्केरी, लालासाहेब शिंदे, रामा देवर्डे उपस्थित होते. आभार बी. डी. वाजंत्री यांनी मानले.

                     

No comments:

Post a Comment