बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा
श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष व हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर कर्नाटक अध्यक्ष रवीकुमार कोकितकर (रा. हिंडलगा, ता. बेळगाव) यांच्यावर अज्ञातांकडून बेळगाव - वेंगुर्ला रस्त्यावर हिंडलगा येथे शनिवारी सायंकाळी ८ वाजता मराठी शाळेजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरानी गोळीबार करून जखमी केले आहे. रवीकुमार यांच्या चार चाकी वाहनावर हा गोळीबार झाला आहे. जखमी दोघांवर बेळगाव येथे खाजगी तसेच सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून अधिक तपास सुरू आहे. गोळीबाराचे अद्याप कारण समजू शकले नाही.
No comments:
Post a Comment