होन्याळी येथून शांताराम सुतार एक महिन्यापासून बेपत्ता, शोधाशोध सुरूच - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2023

होन्याळी येथून शांताराम सुतार एक महिन्यापासून बेपत्ता, शोधाशोध सुरूच

 

 शांताराम कृष्णा सुतार 

आजरा / सी. एल. वृतसेवा 

       होन्याळी (ता. आजरा) येथील शांताराम कृष्णा सुतार वय - ५ ७ हे घरातून कुलूप बंद करून एक महिन्यापासून बेपत्ता झाल्याची वर्दी आजरा पोलिसांत पत्नी सोनाली शांताराम सुतार यांनी दिली आहे.

      शांताराम कृष्णा सुतार, हे रंगाने सावळे, अंगाने मध्यम बांधा, अंदाजे उंची ५ फुट २ इंच, नाक सरळ, चेहरा गोल केस काळे-पाढरे, अंगात पांढरा रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट, पायात बैराठी कंपनीचे चप्पल, मराठी हिंदी भाषा बोलतात.

          १२ / १ / २०२३  रोजी सकाळी ९ वा. चे सुमारास आपले राहते घरास कुलूप लावून कोणास काही न सांगता घरातुन निघुन गेले आहेत ते अद्याप घरी परत आले नाही. त्यांची शोधा शोध केली असता सापडू शकले नाहीत. सदर वर्णनाचा कोणी सापडल्यास आजरा पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment