पेरणोली येथे मराठा सेवा संघाची ५ रोजी सभा - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2023

पेरणोली येथे मराठा सेवा संघाची ५ रोजी सभा


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         मराठा सेवा संघ व अन्य कक्षांची संयुक्त मासिक सभा रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पेरणोली (ता. आजरा) येथे होणार आहे. हनुमान मंदिर हॉल येथे संपन्न होणाऱ्या सभेत मराठा सेवा संघाचे जिल्हा, तालुका, शहर, गाव व शाखा स्तरावरील कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

      सभेत मराठा तरुणांना तज्ज्ञांमार्फत उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, राष्ट्रीय बँकातून मिळणारे कर्ज आदी विविध माध्यमातून मिळवता येणारे लाभ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठा सेवा संघ व अन्य कक्षांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणे, मराठा सेवा संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात मराठा समाजाचा वधू- वर मेळावा आयोजित करणे, मराठा सेवा संघाचे तालुका स्तरावरील पदाधिकारी निवडणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव, समाजातील गरजू तरुणांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महिपती बाबर व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment