पंचमहाभूत लोक महोत्सवासाठी बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2023

पंचमहाभूत लोक महोत्सवासाठी बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पंचमहाभूत लोकमहोत्सव कणेरी मठ कार्यक्रमासाठी बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेज बागिलगे ता. चंदगड येथून आज 102 साड्या, प्लास्टिक 50 पिशव्या, 31 वाट्या, 52 ग्लास, 12 तांबे, 70 ताट, 08 प्लेट  आणि 12 किलो तुरडाळ असे साहित्य पाठवण्यात आले. माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे आदेशाने हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला. 

        दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बागिलगे येथे रवळनाथ यात्रा संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पडून होते. हे प्लास्टिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यातून 30 पिशव्या प्लास्टिक मिळाले. विद्यार्थ्याने आपल्या घरातील प्लास्टिक व देण्याजोगे प्रापंचिक साहित्य विद्यालयात जमा केले हे सर्व साहित्य पंचमहाभूत लोक महोत्सव कणेरी मठ कोल्हापूर येथील पंचमहाभूत लोक महोत्सव उपक्रमासाठी  पाठविण्यात आले असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक  एस. एस. तुर्केवाडकर सहाय्यक शिक्षक एम. एन. शिवनगेकर, ए. बी. नाईकवाडी, पी. एस. मगदूम, आर. जी. शिवनगेकर, टी. व्ही. पाटील, के. टी. चिंचणगी, एस. जी. पाटील, श्रीमती व्ही. एन. मुंगारे, श्रीमती जे. एम. मजुकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment