कुदनूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जोतिबा जाधव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2023

कुदनूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जोतिबा जाधव यांचे निधन

जोतिबा आप्पाजी जाधव

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     कुदनूर (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक जोतिबा आप्पाजी जाधव (वय ७५) यांचे आज रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर कुदनूर येथे (हंदीगणूर मार्गावरील स्मशानभूमी) आज दुपारी २.०० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते राजगोळी खुर्द शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व कुदनुर येथील कामधेनु दूध संस्थेचे संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित चिरंजीव, कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


No comments:

Post a Comment