अशोक बाचुळकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2023

अशोक बाचुळकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

 

प्रा. डॉ. अशोक बाचूळकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      आजरा महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांच्या नुकताच 'जलते हुए पेड और पंछी' या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'मामा वरेरकर अनुवाद पुरस्कार' जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

       चंदगड तालुक्यातील कागणी या छोट्या गावी शेतकरी कुटुंबातील अशोक सन १९९६ मध्ये शिवाजी यांनी विद्यापीठ कला शाखेत प्रथम येऊन राज्यपाल सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यांच्या नाटककार भीष्म साहनी या पहिल्याच समीक्षा ग्रंथास २००६ मध्ये भारत सरकारकडून एक लाख रूपयांच्या पुरस्कारासह हिंदी लेखक म्हणून गौरविण्यात आले आहे.  लक्ष्मीनारायण लाल के 'मिथक नाटक' या समीक्षा ग्रंथास २०११ साली राष्ट्रभाषा स्वाभिमान न्यास गाजियाबाद उत्तर प्रदेश यांच्याकडून  'डॉ लक्ष्मीनारायण लाल स्मृती पुरस्कार' प्राप्त झाला आहे. अखिल भारतीय कवयित्री सम्मेलनमार्फत मलेशिया येथे जुलै, २०१४ मध्ये 'मैन आफ दी ऐज' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

        अशोक बाचुळकर यांचे यापूर्वी ४ समीक्षात्मक ग्रंथ, १० हिंदी मराठीतील अनुवादीत ग्रंथ, २ कथासंग्रह आणि ४ संपादित ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. शांता शेळके, कुसुमाग्रज, इंद्रजीत भालेराव  व उत्तम कांबळे यांच्या कवितांची हिंदी भाषांतरे प्रकाशित झालेली आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी ४५ हून शोधनिबंधांचे सादरीकरण केलेले आहे. १०० हून अधिक शोधनिबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम. फिल. आणि पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे. याशिवाय सांगली आकाशवाणी वरती निवेदक म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावरती निवडून आले आहेत. शिवाय आजरा शहरातील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरचे ते अध्यक्ष आहेत.

No comments:

Post a Comment