तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन दरीत कोसळून एक जण ठार - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2023

तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन दरीत कोसळून एक जण ठार

 


दोडामार्ग, दि. १२ मार्च प्रतिनिधी

           तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी रविवारी आलेली क्रेन टेम्पो बाहेर काढत असताना ती दरीत कोसळून एक जण ठार झाल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. याबाबत चंदगड पोलिस संपर्क साधला असता अपघात घडल्याचे सांगितले. यात दोन जण जखमी झाले तर एकाचे निधन झाले आहे. ही घटना रविवारी (ता. १२) साडेसहा वाजता घडली 

       तिलारी घाटात शनिवारी पडलेला बोलोरा पिकअप काढण्यासाठी रविवारी बेळगाव येथून क्रेन मागवली होती. पण बोलोरा पिकअप बाहेर काढत असताना क्रेनवरील ताबा सुटल्याने ती दरीत कोसळून एक जण ठार झाला. 

      चंदगड पोलिस स्थानकात माहिती मिळताच पोलिस नाईक इतर घटनास्थळी दाखल झाले. पण क्रेन दरीत पडली होती. त्यामुळे आत अडकलेल्या मृत व्यक्तीला अंधार पडल्याने बाहेर काढता आले नाही, अशी माहिती चंदगड पोलिसांनी दिली. तिलारी घाटात दिवसेदिवस अपघात वाढत चालले आहेत. पण सुरक्षेसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment