वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करा, संघटनेकडून आमदार पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2023

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करा, संघटनेकडून आमदार पाटील यांना निवेदन

शिनोळी (ता. चंदगड) येथे आम.राजेश पाटील यांचा वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेकडून सत्कार करताना संजय कुट्रे,महादेव अडसुळे,यावेळी बाजूला लुगडे,बेनके, खोत,पाटील आदी

चंदगड /प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यासह वृत्तपत्र व्यवसायतील विविध घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या मागणीचे निवेदन चंदगड-गडहिंग्लज तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आम राजेश पाटील यांना देण्यात आले. शिनोळी (ता. चंदगड) येथे संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या मागणी साठी संघटनेने अत्ता रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. या मागणीसाठी कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चाही काढण्यात आला आहे. यावेळी आम. पाटील यांची शिवाजी विद्यापीठ आधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल चंदगड व गडहिंग्लज तालुका वृत्तपत्र संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे, चंदगड तालुका अध्यक्ष संजय कुट्रे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष महादेव अडसुळे, नामदेव लुगडे, रवळू पाटील, मारुती बेनके, विष्णू पाटील, सुरेश खोत, अजित स्वामी, भीमराव माने, राजेंद्र पाटील, काशिनाथ जाधव, पंडित पाटील, सुधीर सांबरेकर, सुभाष गावडे, विजय सुतार, धनंजय शेटके, विनाय कडुकर,कुमार करशेट्टी, राजेंद्र गुरव,विठ्ठल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment