'केरवडे-वाळकुळी' ठरली जिल्ह्यातील पहिली 'हायटेक ग्रामपंचायत' - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2023

'केरवडे-वाळकुळी' ठरली जिल्ह्यातील पहिली 'हायटेक ग्रामपंचायत'

'निडली' हायटेक व्हाट्सअप चे लोकार्पण करताना केरवडे- वाळकुळी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, अंगणवाडी व आरोग्य सेविका.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 चंदगड तालुक्यातील 'केरवडे, वाळकुळी ग्रुप ग्रामपंचायत' ने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली हायटेक ग्रामपंचायत होण्याचा बहुमान मिळविला आहे. सरपंच वृषाली करबंळकर, उपसरपंच रवींद्र सुतार यांची सह  शंकर नार्वेकर, संतोष बारवेलकर, यल्लुबाई यादव आदी सदस्य, आरोग्य सेविका,  अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक आदींच्या प्रयत्नातून पहिली हायटेक ग्रामपंचायत होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या कामी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांचे प्रयत्न, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
      सध्याच्या डिजिटल युगात हायटेक ग्रामपंचायत हा कुतुहलाचा विषय बनला आहे. त्यातही तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले गंधर्वगडाच्या पायथ्याशी असलेल्या व दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या या ग्रुप ग्रामपंचायतीने हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलत इतर पुढारलेल्या गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आता मोबाईलच्या एका क्लिक वर कळणार तुमच्या वार्डात पाणी केव्हा येणार, दवंडी न देता गावासह पुणे, मुंबईत राहणाऱ्या ग्रामस्थांना कळणार ग्रामसभेसह इतर सभा, मिटींगची माहिती, तुमची घरपट्टी, पाणीपट्टी भरली आहे की नाही? भरली असेल तर पावती मिळणार ऑनलाइन..! विविध कर म्हणजे लोकांच्या घामाचा पैसा, तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा  सदुपयोग होत आहे की दुरुपयोग,  शेती, आरोग्य, महिला व बालकल्याण अशा अनेक शासकीय योजनांची माहिती, ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शक सुरू आहे की नाही? हे सुध्दा आपण पाहू शकतो. एकंदरीत गावचा कारभार व सर्वांगीण विकास यामुळे निश्चितच गतिमान होईल. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवता येते. 
    घरपट्टी पाणीपट्टीच्या शंभर टक्के वसुली बरोबरच अद्यावत वेबसाईट वरून ग्रामपंचायतने केलेली विविध लोकोपयोगी कामे तसेच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम जगासमोर मांडता येतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9322387267 या नंबर ला what's app करा अशी माहिती उपसरपंच रविद्र सुतार यांनी दिली.No comments:

Post a Comment